पैठण: तालुक्यातील ११९ गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असुन टँकर सुद्धा वेळेवर येत नसल्याने महिलांचे पाण्यासाठी हाल होत आहे.या पाणी टंचाईमुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी जाणाऱ्या तालुक्यातील भाजप शिवसेनेच्या लोकप्रतिनीधी, पदाधिकारी यांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत असुन तालुक्यातील लिंबगाव येथे तर आमदार भुमरे सह भाजपचे डॉ सुनिल शिंदे यांना खासदार रावसाहेब दानवे यांना गावात आणुन आमची पाणी टंचाई दाखवा तरच प्रचाराला या म्हणत महीलांनी आ.भामरे सह भाजपच्या पदधिकारी यांचे भाषण बंद पाडल्याची घटना सोमवारी रात्री घडलीअसुन या घटनेची तालुक्यात खमंग चर्चा सुरू आहे
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आलेल्या शिवसेना आमदाराला महिलांनी घेराव घालत गावातील पाणी टंचाई बद्दल जाब विचारला. गावात पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांना चारा नाही, त्यावर आधी बोला असे म्हणत महिलांनी आमदार भुमरे, डॉ सुनील शिंदे यांचे भाषण बंद पाडले. महिलांची आक्रमकता पाहून शिवसेना भाजपच्या नेत्यांनी आपले भाषण आवरते घेऊन गावातुन काढता पाय घेतला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पैठण तालुक्यातील विकास कामे व समस्या कडे दुर्लक्ष केले आहे, ते केवळ निवडणूकीला येतात, तालुक्यातील पाणी टंचाई पाहता लोक आता शिवसेनेचे आमदार भुमरे यांना तुम्ही आधी दानवे यांना गावात आणुन गावाची पाणी टंचाई दाखवा म्हणत असल्याने आता दानवेंची पंचायत होणार आहे.दरम्यान तालुक्यातील मतदार हे दानवे वर नाराज असल्याने त्यांनी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांना पुढे करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्यांना देखील तालुक्यातील जनते कडून प्रतिसाद मिळाला नाही.